सीमेवर सैनिक मरताहेत,  पंतप्रधान पंतग उडवताहेत   
उध्दव ठाकरेंचा नरेंद्र मोदीवर हल्ला

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नेहमीच्या स्टाईलने पून्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप सरकारवर ठाकरे शैलीत हल्ला चढविला. सीमेरवर रोज सैनिक मरताहेत, त्याची कुणालाच पर्वा नाही. जगभरातील पंतप्रधानांसोबत अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, लाल चौकात नेऊन तिरंगा फडकवला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिमान वाटला असता. केवळ ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही त्यात शौर्य किती आहे हे महत्वाचं आहे असा टोला ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.
वरळी येथे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली त्यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते. नितीन गडकरींच्या नौदालावरील वक्तवावर आक्षेप घेत राज्यकत्यांचा डोक्यात मस्तवालपणा घुसल्या असल्याचंही ठाकरे यांनी सुनावलं. गाईला मारणे पाप आहे त्याप्रमाणे थाप मारणेही पाप आहे. लोकांना भुलवून सत्ता मिळवणं पाप आहे. थापाबंदी करा असंही ते म्हणाले. सार्वजनिक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेळगाव वक्तव्याचा समाचार घेतला. अमित शहांमुळे चंद्रकांत पाटलांना लॉटरी लागली. कानडीचा इतका पुळका असेल तर त्यांनी कनार्टकात जा असाही सल्ला त्यांनी दिला. कोरेगाव भीमा घटनेमागे अदृश्य हात आहेत. हे हात कोणाचे आहेत सर्वांना माहीत आहे. जेव्हा कधी हे हात सापडतील तेव्हा त्यांची होळी करू असेही ठाकरे म्हणाले. शिवसेना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. इतकंच नाही तर यापुढे देशातील प्रत्येक राज्यातील निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय. हिंदुत्वाच्या मुद्दयावर निवडणुका लढविणार असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केल. काम करणारे आहेत त्यांना पद देण्यात आली आहेत. मिरवण्यासाठी पदं नाहीत अशा कानपिचक्या ठाकरे यांनी दिल्या. विधानसभा लोकसभा निवडणुका कधीही लागू शकतात सर्वांनी कामाला लगा असेही ठाकरे म्हणाले.
—-
आदित्य ठाकरे नेतेपदी
शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा नेतेपदी पाच नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, अनंत गीते तर शिवसेना सचिवपदी मिलींद नार्वेकर, सूरज चव्हाण तर प्रवक्तेपदी अरविंद सावंत, निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब असणार आहेत.
————–

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *