राष्ट्रीय अॅरोबिक स्पर्धेत डोंबिवलीतील ९ खेळाडूंचे सुवर्ण यश

बँकॉक येथे होणा-या आशियायी स्पर्धेसाठी निवड

डेांबिवली : १२ व्या राष्ट्रीय स्पोर्ट अॅरोबिक आणि फिटनेस स्पर्धेत डोंबिवलीच्या ९ खेळाडूंनी महाराष्ट्र संघातून खेळून २ सुवर्ण १३ रौप्य आणि १ कांस्य अशी १६ पदके पटकावून महाराष्ट्र राज्याने जनरल चॅम्पियनशीपचा पहिल्या क्रमांकाचा चषक पटकावलाय. त्यांच्या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. या खेळाडूंची मे २०१८ मध्ये बँकॉक येथे होणा- या आशियाई स्पर्धेसाठी निवड झालीय.
५ ते ७ जानेवारी या कालावधीत गाझीयाबाद उत्तरप्रदेश येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी देशभरातल्या १५ राज्यातील ४८९ खेळाडू सहभागी झाले होते. डोंबिवलीतील “ॲरोबिका -दी स्पोर्टस असोसिएशन चे नऊ खेळाडून. “केडीएमसी क्षेत्र जिल्हा स्पोर्टस् ॲरोबिक आणि फिटनेस असोसिएशन” या जिल्हयातर्फे राज्याच्या संघातून खेळले. स्वराली रावले १ सुवर्ण १ रौप्य, ईश्वरी शिरोडकर हिने १ सुवर्ण १ रौप्य, जाई मानकामे ३ रौप्य, सार्थक रावले ३ रौप्य, अमेय शिंदे २ रौप्य, स्तवना कुलकर्णी १ रौप्य, अद्वैत पवार १ रौप्य, श्रेयस पाटील १ रौप्य आणि राधा चव्हाण १ कांस्य अशी ९ खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. संघाच्या घवघवीत यशासाठी संस्थेचे अध्यक्ष माधव मानकामे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून तसेच संगिता संदिप रावले, .प्रमोद पवार व गौरी सचिन चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली अशी माहिती ॲरोबिका-दी स्पोर्टस् असोसिएशनच्या प्रसिध्दी प्रमुख राजश्री आयरे यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!