नारायण राणे यांना एनडीएत येण्याच मुख्यमंत्रयाकडून आमंत्रण
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत आमंत्रण दिलं आहे, याबाबत दोन दिवसात निर्णय घेईन अशी माहिती राणेंनी दिलीय. मात्र मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही नारायण राणे यांनी स्पष्ट केलय.
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेल्या राणे यांनी रविवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पक्षाची स्थापना करून दोन दिवस न उलटताच मुख्यमंत्रयानी त्यांना एनडीएचे आमंत्रण दिलय. राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी अर्धा तास चर्चा केली. राणेंच्या नव्या पक्षाची धोरणं एनडीएसाठी अनुकूल असतील, तर त्यांचं एनडीएत स्वागत करु. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी म्हटले होते.