गुजरात निवडणुकीचा पहिला टप्प्यासाठी आज मतदान
नरेंद्र मोदी व राहुल गांधीची प्रतिष्ठा पणाला
गुजरात : सा- या देशाचे लक्ष वेधलेल्या गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत.
मतदान सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. गुजरातमध्ये सलग 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजप विरूध्द काँग्रेस असाच सामना रंगणार आहे. पाटीदार समाजाच्या आंदोलनाने हार्दीक पटेल यांनीही जोरदार आव्हान उभं केलं आहे तर काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभांनाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच भाजपसाठी सोपी नाही.