महाडमध्ये जेटीची कामे निकृष्ट दर्जाची, वराठी गावातील जेट्टीला मोठा तडा
महाड (निलेश पवार) : खाडीपट्टा विभागात सावित्री नदीमध्ये अनेक गावात महाराष्ट्र सागरी विकास विभागाकडून छोट्या जे टी बांधण्यात आल्या आहेत. मात्र जेटीची कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आलंय. वराठी गावात बांधलेली जेट्टीला अवघ्या दोन वर्षातच मोठा तडा गेलाय. यामुळे स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महाड तालुक्यात सावित्री लगत असलेल्या खाडीपट्टा विभागातील गावांमधून स्थानिक ग्रामस्थ या खाडीवर व्यवसाय करून गुजराण करतात. यामध्ये वाळू उत्खनन, मासेमारी यांचा समावेश आहे. याकरिता महाराष्ट्र बंदर विकास विभागाने छोट्या जे टी बांधून दिल्या आहेत. यामध्ये वराठी, जुई, सव, तेलंगे, गोठे, दासगाव, या गावांचा समावेश आहे. पूर्वी बाणकोट खाडीतून सुटणाऱ्या बोटी वराठी, दासगाव या ठिकाणी थांबत असत. दासगाव प्रमाणेच वराठी हे देखील एक बंदर होते. या गावातील ग्रामस्थ आपल्या छोट्या होड्या घेऊन सावित्रीत मच्छीमारी करतात तर अनेकजण वाळू व्यवसाय देखील करतात. हा व्यवसाय गेली अनेक पिढ्यांपासून सुरु आहे. कांही वर्षापासून याचे प्रमाण कमी झाले आहे. याला प्रदूषित पाणी जबाबदार आहे. या प्रदूषित पाण्याने मच्छीमारी कमी झाली आहे. असे असले तरी आजही अनेकजण स्वतः साठी मासेमारी करतात. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने सावित्री खाडी लगत छोट्या जेट्टी बांधून दिल्या आहेत. यापैकीच वराठी गावात देखील जेट्टी बांधण्यात आली आहे. मात्र निकृष्ट बांधकामामुळे हि जेट्टी अवघ्या दोन वर्षातच तुटली आहे. यामुळे या जेट्टीवरून चालताना धोका निर्माण झाला आहे. वराठी गावात महाराष्ट्र सागरी मंडळाने बांधलेली हि जेट्टी ला मधोमध भली मोठी चीर गेली आहे. यामुळे हि जेट्टी केंव्हाही कोसळू शकते. या जेट्टीवरून चालताना या मोडलेल्या जेट्टीत पाय अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्षं झाल्याने ग्रामस्थमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय.
पूर्वीच्या जलवाहतुकीच्या मार्गावरच वराठी या बंदरात सागरी मंडळाने दोन वर्षापूर्वी जेट्टी बांधली होती. हे काम होत असताना कोणत्याच प्रकारचे स्टील टाकण्यात आले नाही. यामुळे या गळताला या कामाला विरोध दर्शवला होता. या निकृष्ट कामामुळेच या जेट्टीची दुरवस्था झाली आहे – संदेश गोठल वराठी ग्रामस्थ