जागतिक कुराश स्पर्धेत भारतीय संघात २ डोंबिवलीकर खेळाडू
आशुतोष लोकरे आणि पूर्वा मॅथ्यूची गगनभरारी
डोंबिवली : इंटरनॅशनल कुराश असोसिएशनच्या (IKA) अधिपत्याखाली इस्तंबूल , टर्की येथे जाग तिक वरिष्ठ गट कुराश अजिंक्यपद स्पर्धा ४ डिसेंबरला होत आहेत. या भारतीय संघात डोंबिवलीचे पूर्वा मॅथ्यू व आशुतोष गिरीश लोकरे या डोंबिवलीच्या खेळाडूंचा समावेश आहे. आशुतोष हा कल्याण डेांबिवली महापालिकेतील उपअभियंता रोहिणी लोकरे यांचा सुपूत्र आहे. एशियन स्पर्धांचा अनुभव पूर्वा व आशुतोष या दोघांनाही आहे . त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णभरारी घेईल असा विश्वास दोघांनीही व्यक्त केलाय.
कुराश ह्या उजबेकिस्तान मधे उगम पावलेला ३००० वर्षापूर्वीचा द्वंद्वाचा प्रकार आहे. २०१८ मधे जकार्ता, इंडोनेशिया येथे होणारया एशियन गेम्स मधे कुराश चा समावेश करण्यात आला आहे. टर्की येथे होणा-या या स्पर्धेसाठी भारतीय संघात ४ महिला व ५ पुरुष खेळाडू आहेत. ३० नोव्हेंबर रोजी हा संघ टर्कीला रवाना झालाय. पूर्वाने आत्तापर्यंत ज्युदोच्या २४ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ६ सुवर्ण, ९ रौप्य, ६ कांस्यपदके मिळवली असून एशियन ज्युदो स्पर्धेची ती सुवर्णपदक विजेती आहे. कुराश या खेळाच्या ३ राज्य स्पर्धा व ३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त पूर्वाने कुराशच्या ज्युनीयर एशियन व एशियन इनडोअर गेम्स् या स्पर्धांमधे कांस्यपदकांची कमाई केली आहे. पूर्वाच्या नावावर अनेक पुरस्कार व मानसन्मान मिळाले आहेत. आशुतोष लोकरे हा सुद्धा ज्युदोचा राष्ट्रीय खेळाडू असून आत्तापर्यंत त्याने ज्युदोच्या १२ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. मूंबई युनिवर्सिटीत त्याला सुवर्ण पदक मिळवले आहेत. आतापर्यंत आशुतोषने ७४ सुवर्ण, १५ रजत, १४ ब्राँन्झ पदक पटकावली आहेत. २०१६ मध्ये इंटरनॅशनल बीच क्रुश स्पर्धेत ६० किलो वजनी गटात त्याने पहिले ब्राँन्झ पदक देशाला मिळवून दिले. २००५ ते २०१७ या कालावधीत आशुतोष ११ वेळा राष्ट्रीय पातळीवर २१ वेळा राज्यपातळीवर ५ वेळा आंतरमहाविद्यालयीन स्तरावर ज्युडो खेळलाय. या कालावधीत आशुतोषने सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट ही महत्वपूर्व पदवी मिळवलीय. आशुतोषला अनेक पुरस्कार व मानस्मान मिळाले आहेत. विविध वजनी गटात त्याने नैपुण्य मिळावलय. प्रशिक्षक के. एस. मॅथ्यू व लीना मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनामुळेच या खेळाडूंनी डोंबिवलीचे नाव जगभरात उमटवले आहेत.