डोंबिवली, ता. २० (प्रतिनिधी);-
डोंबिवली विधानसभेतील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला.डोंबिवली पूर्वेतील स वा जोशी हायस्कूलमध्ये चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी मतदान करण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडतात. पण आम्हाला खात्री आहे की दोन अडीच वर्षांमध्ये विकासात्मक काम महायुतीच्या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने केलेली आहेत. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स महायुतीसाठी आहे . आम्हाला खात्री आहे की महायुतीच्या सर्व जागा यावेळी भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.