पंकजा मुंडेंचे दसरा मेळाव्याचे भाषण गडावर होणार की नाही
औरंगाबाद : भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद यंदाही गाजला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री यांना पत्र लिहिून२० मिनिटांचा वेळ द्यावा, अशी विनंती एका पत्राद्वारे केली आहे. मात्र गडावर राजकीय भाषण नको हा ट्रस्टचा निर्णय आहे असे नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे दसरा मेळाव्याचे पंकजा मुंडे यांचे भाषण कुठे होणार याचा यक्षप्रश्न सर्वांनी पडला आहे.
गडाच्या सुरक्षेसाठी गडावर कोणत्याही राजकीय पक्षाचं भाषण नको, अशी भूमिका महंत यांनी घेतलेली आहे. शास्त्री यांच्या भूमिकेमुळे पंकजा मुंडे यांना मागील वर्षी भगवान गडाच्या पायथ्याला दसरा मेळाव्याचे भाषण करावे लागले होते. मात्र दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी पहिली आणि शेवटची विनंती करते आहे, अशा आशयाचे पत्र मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना लिहिले आहे. मागील वर्षीच्या वादावर पडदा टाकत भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी २० मिनिटांचा वेळ द्यावा, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली होती. मात्र महंत यांची भूमिका अद्यापही ठाम आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे दसरा मेळाव्याचे भाषण भगवान गडावर होणार की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.