नवी दिल्ली : दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथे असलेल्या एअर इंडियाची इमारत आजपासून महाराष्ट्र सरकारच्या अधिकृतरीत्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीची झाली आहे. केंद्र सरकारच्या मालकीची ही २३ मजली इमारत राज्य सरकारने १६०१ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या इमारतीचे हस्तांतर करण्यास केंद्र सरकारने आज गुरुवारी मंजुरी दिली. इमारतीची मालकी असलेल्या ‘एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी’कडे असलेली २९८.४२ कोटी रुपयांची थकबाकी राज्य सरकारने माफ केल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिव तुहिन कांत पांडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली.