चंदीगड : हरियाणचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज कर्नाल विधानसभा मतदारसंघातूनही राजीनामा देत असल्याची घोषणा केली. मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नायबसिंग सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभेत आमदारकीचा राजीनामा देताना खट्टर यांनी सांगितले की, ‘मी आज जाहीर करतो की मी कर्नाल विधानसभेच्या आमदार पदाचा राजीनामा देत आहे. यापुढे माझ्यावर दिली जाणारी जबाबदारी मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिन. आजपासून आमचे नायब सिंग सैनी कर्नाल विधानसभेची जबाबदारी स्वीकारतील. आता नवीन मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघाची काळजी घेतील.’ खट्टर हे करनाल मतदारसंघाचे आमदार होते. आता त्यांनी राजीनामा दिल्याने आता सैनी हे पोटनिवडणूक लढवतील. सैनी हे सध्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.