इस्लामाबाद : पाकिस्तानचे फर्स्ट लेडी हे पद हे राष्ट्रपतींच्या पत्नीला मिळत असते,परंतु राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे त्यांच्या मुलीला पाकिस्तानच्या ‘फर्स्ट लेडी’ चे पद देणार आहेत. देशाचे नवनियुक्त राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी त्यांची मुलगी असिफा भुट्टो झरदारी यांना देशाची पहिली महिला म्हणून औपचारिक पद्धतीने मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

सामान्यतः देशाची पहिली महिला ही राष्ट्रपतींची पत्नी असते.तसे पाहिले तर पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी आपल्या मुलीला फर्स्ट लेडी पदासाठी जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे असिफा भुट्टो यांना पहिल्यांदाच प्रतिष्ठित फर्स्ट लेडीच्या स्थानावर पोहोचवले आहे, जो देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे.असिफा ही पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि देशाचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या झरदारी यांची ३१ वर्षांची सर्वात लहान मुलगी आहे. २००७ मध्ये एका निवडणूक रॅलीत बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली.त्यामुळे २००८ ते २०१३ या काळात झरदारी यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात पहिल्यांदा हे पद रिक्त राहिले. ते आता
झरदारी यांच्या मुलीला मिळणार आहे.खरे तर त्यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने आधीच असिफाची चर्चा करण्यास सुरुवात केली होती.परंतु त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!