नवी दिल्ली : भूतानचे पंतप्रधान दाशो टोबगे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून १४ ते १८ मार्चदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर टोबगे यांचा हा पहिलाच परदेशी दौरा असणार आहे. त्यांच्यासोबत भूतानचे परराष्ट्र व्यापार मंत्री, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री, उद्योग मंत्री आणि भूतानचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह मंत्र्यांचे शिष्टमंडळ असेल. या भेटीदरम्यान दाशो टोबगे राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. टोबगे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इतर भारतीय मान्यवरांचीही भेट घेणार आहेत. भारत आणि भूतानमध्ये मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत. टोबगे यांच्या भेटीमुळे हे संबंध आणखी घट होणार आहेत.