नवी दिल्ली : संपूर्ण जगाला भयभीत करून सोडलेल्या २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कोरोना काळात प्रचंड जीवितहानी झाली होती.याच कोरोना महासाथीमुळे जागतिक आयुर्मान १.६ वर्षांनी घटले असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘द लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध केला आहे.तसेच या दोन वर्षांत प्रौढांच्या मृत्यूदरात मोठी वाढ झाली होती.तर बाल मृत्यू दर मात्र ५ लाखांनी कमी झाला होता अशी माहिती समोर आली आहे.

‘इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’ यांच्या समन्वयाने हे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी’ (जीबीडी) २०२१ च्या अद्ययावत अंदाजांचाही समावेश करण्यात आला.या संशोधनातून ‘कोविड-१९’ महासाथीच्या पहिल्या दोन वर्षांच्या संदर्भात लोकसंख्याशास्त्रीय कलाचे पूर्ण मूल्यमापन केले.या कालावधीत ८४ टक्के देश आणि भूप्रदेशातील आयुर्मान घटले होते.
मेक्सिको शहर,पेरू आणि बोलिव्हिया यासारख्या शहरात आणि देशांत सर्वाधिक नुकसान झाले होते.२०२० आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये प्रौढांच्या मृत्युदरात वाढ झाल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे बाल मृत्युदरामध्ये होत असलेली घट ही कोरोना काळातही सुरू राहिली.मात्र आधीच्या काही वर्षांपेक्षा त्याचा वेग मंदावला होता.
पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण २०१९च्या तुलनेत २०२१ मध्ये साधारण पाच लाखांनी कमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *