कल्याण जिल्हा न्यायालय वकिल संघटनेची मागणी
कल्याण : कल्याण न्यायालयात न्याय निवाड्यासाठी आलेल्या एका इसमाचा न्यायाधीशांच्या दालना बाहेर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर यापूर्वी एका वकिलाचा ब्रेन हॅमरेज झाल्याने मृत्यू झाला होता तर दुस-या घटनेत वकिलाला हृदयविकाराचा झटका आला होता मात्र त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला होता. ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पक्षकार न्यायनिवाड्यासाठी कल्याण सत्र न्यायालयात येत असून, न्यायालयात कामाचा ताणही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पुणे जिल्हा न्यायालयाप्रमाणेच कल्याण न्यायालयात अद्यावत डिस्पेंसरी घडण्यात यावी अशी मागणी कल्याण जिल्हा न्यायालय वकिल संघटनेचे केली आहे.
एका न्यायनिवाड्याच्या संदर्भात संजय नायक आपल्या महिला नातेवाईकांसह कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आले होते. न्यायाधीशांच्या चालना अन्य खटल्यांची सुनावणी सुरू होती. यामुळे नायक हे बाहेरील बाकड्यावर बसत चर्चा करीत होते. मात्र याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते बाकड्यावरून लादीवर कोलमडले. न्यायालयीन दालनात उपस्थित नागरिक वकील व पोलिसांना सुरुवातीस आकडी आल्याचा संशय आल्याने ते काही वेळात शुद्धीत येतील अशी आशा बाळगून होते. मात्र नायक शुद्धीवर येत नसल्याने प्रवीण गडा या युवकाने त्यांना आपल्या शरीरातील सीपीआर) त्यांच्या शरीरात श्वासोस्वास देण्यास सुरुवात केली. शुद्ध हरपून बसलेले नायक यांनी काही क्षण प्रतिसाद देऊन बंद झालेले डोळे काही क्षणात उघडले. यानंतर त्यांना बाकड्यावर झोपवत प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र या उपचाराला त्यांनी योग्य तो प्रतिसाद न दिल्याने न्यायाधीशांच्या दालनाबाहेर नायक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत त्यांना तात्काळ रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारार्थ नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासित मृत झाल्याचे त्यांनी घोषित केले.
कल्याण न्यायालयात पाच महिन्यापूर्वी वकील म्हणून कार्यरत असणारे प्रमोद गवई न्यायालयीन आवारातील पत्राच्या शेडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र तात्काळ रुग्णालयात त्यांना भरती केल्याने त्यांचा जीव वाचला होता. तसेच कल्याण न्यायालयातील वकील रसाळ यांना देखील ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला होता.
कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना निवेदन देऊन न्यायालयीन आवारात तात्काळ प्राथमिक उपचार व्हावेत याकरिता उभारणी करण्याची मागणी केली आहे. पुणे जिल्हा न्यायालयात अद्यावत डिस्पेंसरी उघडण्यात आले असून कल्याण न्यायालयातही उघडून न्यायालयात घडणाऱ्या दुःखद घटनांना असे निवेदनात एडवोकेट जगताप यांनी म्हटले आहे.