कल्याण – श्रीमलंगडाच्या पायथ्याशी पार पडणारा राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव अर्थातच श्रीमलंगगड महोत्सवाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. यापद्धतीचे महोत्सव होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे राजकीय रत्न हे अशा सप्ताहांसाठी फार मोठा आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. श्री. बाळू महाराज गिरगावकर यांनी केले. तसेच या महोत्सवाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे महत्व अधोरेखित झाले आहे. लाखांच्या संख्येने लोक या कार्यक्रमाला येणे म्हणजे आपल्या अधिष्ठानाची ताकद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

भागवत धर्माचा समाजप्रबोधनाचा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर नेण्याच्या उद्देशाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांच्या विद्यमाने श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प.श्री. संजयनाना धोंडगे, दुसऱ्या दिवशी ह.भ.प.श्री. निवृत्ती महाराज इंदुरीकर तर तिसऱ्या दिवशी ह.भ.प.श्री. बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन पार पडले. या संपूर्ण कीर्तन महोत्सवाला कल्याण, अंबरनाथ तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असून या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी पार पडलेल्या ह.भ.प.श्री. बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

यावेळी किर्तनकार ह.भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांनी आपल्या अमोघ वाणीतून समाजप्रबोधन केले. बाळू महाराज गिरगावकर यांनी समाजातील दिशाहीनता आणि चुकीच्या पद्धतींवर संत तुकोबारायांच्या अभांगांतून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच इतका भव्य आणि मोठा हरिनाम सप्ताह आयोजित केल्याबद्दल तसेच या सप्ताहाला मिळणाऱ्या अत्यंत मोठ्या प्रतिसादाबद्दल बाळू महाराज गिरगावकर यांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले. श्रीमलंगडाच्या पायथ्याशी पार पडणारा राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव अर्थातच श्रीमलंगगड महोत्सवाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. यापद्धतीचे महोत्सव होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे राजकीय रत्न हे अशा सप्ताहांसाठी फार मोठा आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प.श्री. बाळू महाराज गिरगावकर यांनी केले. तसेच या महोत्सवाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे महत्व अधोरेखित झाले आहे. लाखांच्या संख्येने या लोक या कार्यक्रमाला येणे म्हणजे ही आपल्या अधिष्ठानाची ताकद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *