ठाणे, अविनाश उबाळे : ऑक्टोंबर सूरु होताच हिवाळ्याची चाहूल लागते मग सहयाद्रीच्या उंच पर्वत रांगेतील डोंगर माथे पहाटे पडणाऱ्या दाट पांढऱ्याशुभ्र धुक्यात दिसेनासे होतात. आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास होतो.चहूबाजूने दिसणारी हिरवीगार वृक्षांची रांग आणि हिवाळ्यातील गडद पांढऱ्या धुक्यांचा खेळ आणि धुक्यांत हरविलेल्या वाटा असा अद्वभूत नजरा प्रत्यक्ष अनुभवयाचा असेल तर हिवाळ्यात माळशेज घाटाची सफर करायलाच हवी असं हे माळशेज घाट  सध्या हिवाळ्यातील या बोचऱ्या थंडीत  पर्यटकांना भुरळ घालत आहे.

कल्याणपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगर पुणे या मार्गावर माळशेज घाट लागतो उंच डोंगर माथे घनदाट जंगल,दुर्मिळ वन्यप्राणी, पशुपक्षी, यांचा मुक्त संचार घाटातील नागमोडी रस्ते वृक्षांची सभोवताली दिसणारी रांग,उंच डोंगर माथे व खोल दऱ्या,पक्षांचा किलबिलाट पांढऱ्या शुभ्र गडद दाट धुक्यांत लपलेले डोंगर आणि ऊन सावली यांचा शिवाशिवीचा खेळ रस्त्याकडेला मुक्तपणे संचार करणारी वानरं हा सारा अनमोल ठेवा माळशेज घाटात आहे.पावसाळ्यात तर येथील धबधब्यांत चिंब भिजण्यासाठी पर्यटक येथे येतातच पण आता हिवाळ्या मोसमातही पर्यटकांनी माळशेज घाटाल विशेष अशी पसंती दिली आहे .

निसर्गाची मजा लुटण्यासाठी हिवाळ्यातही पर्यटकांची पावले माळशेज घाटाकडे वळत आहेत. मुंबई ,ठाणे ,कल्याण ,डोंबिवली ,शहापूर ,मुरबाड ,नगर ,पुणे ,नाशिक ,या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात माळशेज घाटात सहलीसाठी येत असतात घाटात येणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम दर्शन होतं ते इथल्या जंगली वानरांचं रस्त्यावर घाटात वानरांचे तांडेच तांडेच येथे पहावयास मिळतात माळशेज घाटातील ही अनोखी सफर करताना निसर्गाच्या जवळ गेल्याचा एक विलक्षण अविस्मरणीय आनंद मिळतो असे कल्याणचे पर्यटक जनार्दन टावरे यांनी बोलतांना सांगितले.माळशेज घाटा जवळील स्थानिक आदिवासी आवळे विकतांना नजरेस पडतात तर  घाटात गरमागरम  चहा ,वडापाव,भाजलेले कणीस, विक्रीतुन स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो आहे हे विशेष आहे .

 माळशेज घाटात जायचे कसे –
माळशेज घाटात जाण्यासाठी खाजगी वाहनाने अथवा कल्याणहून आळेफाटा नगर  पुणे या परिवहनच्या एसटी बसने जाता येते पर्यटकांना राहण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने येथे निवासस्थांन बनवली आहेत येथे भोजनासाठी एक हॉटेलची सोय आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *