ओपन टेनिस स्पर्धेत भिवंडीच्या गुंजन जाधवची भरारी
भिवंडी – ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष गटाच्या दुहेरी अंतिम सामन्यात गुंजन जाधव यांनी यश मिळवलं. गुंजन हा भिवंडीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांचा मुलगा आहे.
बेंगळुरू(कर्नाटक) येथे दि.6 नोव्हेंबर पासूनओपन टेनिस स्पर्धेस सुरूवात झाली. गुंजन सुरेश जाधव (महाराष्ट्र)व सि.एच अर्जुन(कर्नाटक) विरुद्ध फहाद मोहंमद व पृथ्वी शेखर (चेन्नई) यांच्यात सामना रंगला होता. त्यामध्ये गुंजन जाधव व अर्जुन हे उपविजेते झाले. 6-1,6-1 , गुंजन हा मुंबई , चंदीगड ,पंजाब , बँगलोर ,हैद्राबाद ,गुहाटी, दिल्ली सह इतर राज्यातही विजेता ठरला आहे , तर बांगलादेश , नेपाळ , फ्रान्स या देशात सुद्धा आपले नाव गाजवले आहे ,एकिकडे जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र काम करीत असतानाच दुसरीकडे मुलांवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या मनात देशाचे नाव उज्वल करण्याची जिद्द निर्माण करणारे वडील सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.