डोंबिवली, ५ जुलै : पावसाळ्यात अपघात टाळ्ण्यायासाठी व सुरक्षित प्रवासासाठी वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी, ”हे करावे आणि हे करू नये” तसेच अचानक वाहने बंद पडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक वाहन चालकाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी कल्याण वाहतूक विभाग सहायक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत डोंबिवली पूर्वेकडील म्हसोबा चौक येथे माहितीपत्रक वाटप करून जनजागृती केली.
तसेच फ्लॅश विभागाकडून कारवाई करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८१ वाहनचालकांवर ई चलन कारवाईद्वारे १, ०१,००० रूपये दंड आकारला असून त्यापैकी २३ हजार रूपये दंड जागीच वसूल करण्यात आला आहे.
पावसाळ्यात अचानक रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे नागरिकांना याद्वारे आवाहन डोंबिवली वाहतूक उपविभाग पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केले आहे.