राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या मागील बाजूस ईडीचे कार्यालय असल्याने जयंत पाटील हे पायी चालत ईडी कार्यालयात गेले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू झाली असून या चौकशीला किती वेळ लागताे याकडे कार्यकत्यांचे लक्ष वेधले आहे.

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून हि चौकशी होत आहे याप्रकरणाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आव्हान केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई, पुणे, सांगली, सातारा, नागपूर, औरगांबाद राज्यातील विविध भागात आंदोलन सुरू आहे. सकाळपासूनच राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली असून, ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. टाळ मृदुंग आणि काळे झेंडे दाखवित कार्यकत्यांकडून निषेध केला जात आहे. ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून बॅरीकेटिंग करण्यात आलं आहे. दरम्यान प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकत्यांनी मोठया संख्येने गर्दी केल्याने कार्यकत्यांच्या गराडयातून पाटील हे पायी चालत ईडी कार्यालयात पोहचले पोलिसांनी बॅरिगेटींग लावून कार्यकत्यां अडविले. यावेळी जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *