ठाणे : अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच त्याचा फटका पक्षांनाही बसला आहे त्यामुळे अनेक पक्षांना जीव गमवावा लागत आहे सध्या स्थलांतराचा हंगाम लक्षात घेता कोणत्याही रोगाची शक्यता तपासण्यासाठी सखोल तपासणी करण्यात यावी तसेच पडलेल्या पक्ष्यांना सुरक्षितपणे हाताळण्यासाठी त्यांच्या बचावासाठी मदत करण्यासाठी वनविभागाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी वजा विनंती येऊर एनव्हायर्नमेंटल सेासायटीचे संयोजक रोहित जोशी यांनी केलीय

लिटल स्विफ्ट बर्डसाठी 100 हून अधिक रेस्क्यू कॉल्स

१ डिसेंबरपासून ठाणे आणि मुंबई शहराच्या विविध भागांतून लिटल स्विफ्ट (अपस ऍफिनिस) पक्ष्यासाठी मोठ्या संख्येने रेस्क्यू कॉल्स येत आहेत. लिटल स्विफ्ट बर्डसाठी 100 हून अधिक कॉल्स आले आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या पक्ष्यांवर परिणाम झाला आहे सुटका करण्यात आलेले पक्षी पावसामुळे जमिनीवर कोसळले असून उडूही शकत नाही अशी अवस्था झालेली आहे येऊरमध्ये वाचवलेल्या पक्ष्याचा काल मृत्यू झाला. त्यामुळे प्रसिद्ध बचावकर्ते WWA चे आदित्य पाटील आणि RAAW चे पवन शर्मा यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते लोकेशन तपशीलांसह सुटका केलेल्या पक्ष्यांची यादी तयार करत आहेत असेही जोशी यांनी सांगितले असूनए मात्र वनविभागाकडूनही मार्गदर्शन करण्यात यावे याकडे लक्ष वेधले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *