राज ठाकरेंपेक्षा, अमित ठाकरेच ठरले लक्षवेधी : ठाकरे कुटूंबातील पाचवा शिलेदार राजकारणात ?
डोंबिवली (संतोष गायकवाड) : मनसे अध्यक्ष राज हे दोन दिवस कल्याण डोंबिवलीच्या दौ-यावर होते. यात सर्वात लक्षवेधी ठरले ते म्हणजे राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचा दौ-यातील सहभाग. राज ठाकरे हे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते असो वा इतर नागरिक यांच्याशी संवाद साधताना अमित हे वडीलांच्या प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करीत होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या दौ- यात राज ठाकरेंपेक्षा अमित ठाकरेंनी सगळयांचे लक्ष वेधून घेतलं होत. ठाकरे कुटूंबातील हा पाचवा शिलेदार राजकारणात येण्याचेच संकेत आहेत.
ठाकरे घराणे हे महाराष्ट्रातील एक राजकीय वलय असणारं घराण म्हणूनच ओळखले जाते. अमित ठाकरे हे ठाकरे घराण्यातील तिस- या पिढीतील. राज ठाकरे हे दोन दिवस कल्याण डेांबिवलीच्या दौ- यावर असताना अमित ठाकरेही त्यांच्याबरेाबर होते. वडीलांच्या प्रत्येक गोष्टीचे ते बारकाईने निरीक्षण करीत होते. कोणाशीही अधिक संभाषण न करता अमित हे प्रत्येक गोष्ट न्याहळत होते. मनसेच्या कार्यकर्ता मेळावा असो पत्रकार परिषद असो अमित यांची उपस्थिती प्रकर्षाने दिसून आली. विरोधी पक्षनेता मंदार हळबे यांनी साकारलेल्या स्व.श्रीपाद सखाराम उर्फ बाळासाहेब हळबे व्यायामशाळेचा उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी अमित यांनी व्यायामशाळेत चक्क व्यायामही केला. त्याठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक राज ठाकरे यांना भेटायला आले होते. राज हे ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत असताना, अमित ठाकरे एका कोप- यात हाताची घडी घालून उभे राहून हे सगळे न्याहळत होते. राज यांच्यापेक्षा अमित यांच्याकडेच अनेकांच्या नजरा होत्या. अमितबरोबर फोटो काढण्यासाठी मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी चांगलेच उत्सूक झाले होते. मनसेच्या प्रत्येक निवडणुक प्रचारात अमित यांचा नेहमीच सहभाग असतो. आता ते राज ठाकरेंसोबत दौ-यातही सहभागी होऊ लागलेत. सभा असो वा दौरा बाळासाहेब नेहमीच राज यांना सोबत घेऊन जात असत. याची आठवण राज ठाकरे अनेकदा सांगतात. त्याच पावलावर पाऊल ठेवीत राज यांच्यासोबत आता अमित ही दिसू लागलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांच्या रुपानं ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. बाळासाहेब, राज, उद्धव आणि आदित्यनंतर आता सक्रीय राजकारणात सहभागी होणारा अमित पाचवा ठाकरे असणार आहे.
ठाकरे घराणे :
पहिले ठाकरे– बाळासाहेब ठाकरे, व्यंगचित्रकार. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना.. मराठी माणसाचा आवाज.
दुसरे ठाकरे – राज ठाकरे, व्यंगचित्रकलेची आवड.. भारजीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेत कार्यरत…२००६ शिवसेनेला जय महाराष्ट्र. २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना.
तिसरे ठाकरे – उध्दव ठाकरे, फोटोग्राफीची आवड.. २००३ शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून राज्यभिषेक…बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख.
चौथे ठाकरे – आदित्य ठाकरे, फुटबॉलची आवड… उध्दव ठाकरे यांचे ज्येष्ठ पूत्र.. १७ ऑक्टोबर २०१० मध्ये युवा सेनेचे अध्यक्षपदी निवड
पाचवे ठाकरे -अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे ज्येष्ठ पूत्र, राज ठाकरेंबरोबर दौ-यात सहभाग.
जय महाराष्ट्र…
महाराष्ट्राचे चाहते, अखंड मराठी मनाचा राजा राजसाहेब, महाराष्ट्राचा अभिमान राजसाहेब.
मित्रांनो महाराष्ट्राला राजसाहेब समजायला वेळ लागेल. पन समजल्यावर वेड लागेल.
मनसे कार्यकर्ता मध्ये जी ऐकीची भावना आहे.ती मला नाही वाटत दुसरया कोणत्या पक्षामध्ये असेल.
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा असेल, तर महाराष्ट्राला राजसाहेबांन शिवाय पर्याय नाही. हे मी नक्की सांगु शकतो.
प्रत्येकाचा एक गुरू असतो. तसे आमचे गुरू राजसाहेब.
देव बदलनारे आम्ही नाही. ज्या प्रमाने आम्ही ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो.
तसेच महाराष्ट्रासाठी अखंड त्याग केलेले भगतसिंग, राजगुरु, सुखदेव असतील.त्यांच्याविषयी जितके प्रेम आमच्या मनामध्ये आहे.तितकेच प्रेम आमच्या मनात राजसाहेबांन विषयी आहे.
एक तळमळीचा नेता , कुनाचाही पाठींबा नसतानी. पक्ष स्थापना.पक्ष स्थापना करून संपुर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष जोमाने उडी घेत आहे.
कुनाच्या कष्टावर नाही तर स्वता:च्या हिमतीवर व मनसे सैनिकांच्या प्रेमावर पक्ष स्थापन करनारा एकमेव पक्षअध्यक्ष………..मा. राजसाहेब ठाकरे.
मुंबई मध्ये म्हने सहा नगरसेवक सोडून गेले.भाडखाऊ जानारच.स्वता:ची गरज भागल्यावर ऊलटनारे असतातच.त्या विषयी मी काय बोलणार.
एकच सांगतो महाराष्ट्र हा शब्द फक्त एकाच नेत्याला समजतो , ते म्हनजे आमचे राजसाहेब. बाकी पन असतील ऊदा . बच्चु कड, नितेश राने व अजुन थोडे फार.
बाकी सारी चोरांची अवलाद.
जय महाराष्ट्र..
आपला – धनंजय बाळासाहेब वाडेकर.
मी लिहिलेलं खर ठरलं.
Frankly,yet to see Amit in action.
But, looking at Aditya’s antics,he is following the footsteps of his father. Absolutely lackluster.Just Thakare surname doesn’t give you oratory skills neither makes you charismatic