वरळीत साकारली ५८ फूट उंच होळी, घोटाळेबाज नीरव मोदीच्या प्रतिकृतीचे दहन

मुंबई  : वरळी बीडीडी चाळ येथे सर्वात उंच अशी ५८ फूट उंचीची होळी साकारली आहे. सध्याच्या गाजलेल्या ११, ५०० कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळ्यावर नीरव मोदी यांची प्रतिकृती साकारण्यात आलीय. डायमंड किंग आणि भ्रष्टाचाराचा निषेध करत रात्री 9 वाजता होळीचे दहन केले जाणार आहे. आपला विघ्नहर्ता या मंडळाकडून बीडीडी चाळ 76 आणि 77 मधील पटांगण, भागोजी वाघमारे मार्ग, वरळी येथे ही होळी उभारण्यात आलीय. देशातील सर्वात उंच होळी असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!