५३ शाळा, ३०,०००० विद्यार्थ्यांचा सहभाग.

विशेष आकर्षण इंडोनेशिया देशाच्या नोटेवर गणपतीची प्रतिमा आणि कंबोडिया देशाच्या नोटेवर गौतम बुद्ध यांची प्रतिमा तर दीडशे देशांच्या पोस्टल स्टॅम्पवर महात्मा गांधी.

डोंबिवली : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 2014 पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यां मधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन 29 व 30 जानेवारी 2025 रोजी रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत पार पडले. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते. तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर्षी 193 देशांच्या करन्सी आणि पोस्टल स्टॅम्प चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले असून या वर्षी 53 शाळा सहभागी झाल्या होत्या तर 98 प्रोजेक्ट मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक, अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले.

5 ते 7 आणि 8 ते 10 अशा 2 गटामध्ये स्पर्धा झाली आणि 1.50 लाखाची रोख बक्षीस विजेत्यांना देण्यात आली. विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पुनर्वापर, आधुनिक भौतिक व रसायन शास्त्र, आधुनिक जीवनशैली व त्याचे फायदे तोटे, आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडल्स, पवन ऊर्जा व त्याचा वापर आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी श्री रतन टाटा व त्यांचा तेजस्वी जीवन प्रवास, पॅरालिम्पिक मधील भारताचा प्रवास, सामाजिक न्याय, भारताची सांस्कृतिक विविधता असे विविध विषय देण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात 5 ते 7 वी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी आणि टिळक नगर विद्यामंदिर प्रथम क्रमांक विभागून तर नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय विभागून आणि डॉन बॉस्को यांना तृतीय तर उत्तेजनार्थ सेंट झोन हायस्कूल तसेच 8 ते 10 वी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला. तर द्वितीय मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागून आणि तृतीय सिस्टर निवेदिता स्कूल तर उत्तेजनार्थ मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आला. पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे 5 ते 7 वी गटात अचीवर हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल, बी आर मडवी स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि 8 ते 10 वी गटात साई इंग्लिश स्कूल, बी टी गायकवाड स्कूल, सिस्टर निवेदिता स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून 5 ते 7 वी गटात तिलक नगर शाळेची राधिका वैद्य, शंकरा विद्यालय ची स्वरा तर्वे तर 8 ते 10 वी गटात प्राची झा, श्री चैतन्य स्कूल आणि कृष्णा जाधव, सेंट जॉन स्कूल यांना पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!