राजाजीपथ ते फडके पथ प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद

डोंबिवली: ता: १७;(प्रतिनिधी):-
शांतताप्रिय डोंबिवली शहराच्या उन्नतीसाठी डोंबिवली फास्ट ते डोंबिवली फर्स्ट हा वसा घेतला आहे. हा वसा हाती घेऊनच गेल्या २०-२५ वर्षांपासून वाटचाल करत आहे आणि निरंतर करत राहणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
प्रत्येक डोंबिवलीकराशी मी एका भावनिक नात्याने जोडला गेलो आहे. याची प्रचिती दररोज येत असल्याचे ते म्हणाले. निवडणूक निमित्त त्यांची शहरात रविवारी पूर्वेला प्रचार रॅली काढण्यात आली होती.
अनुषंगाने राजाजीपथ ते फडके पथ इथपर्यंत सगळे प्रभाग पिंजून काढून मतदारांसमवेत अनेक ठिकाणी स्नेहभेट देत डोंबिवलीकरांशी चव्हाण यांनी संवाद साधला. त्याप्रसंगी सर्वांनी आपुलकीने स्वागत केले आणि विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. डोंबिवलीकरांचा माझ्यावर असणारा विश्वास हा लाखमोलाचा असून या विश्वासाचे सार्थक करण्याचे प्रयत्न निरंतर सुरू राहतील.या ऋणानुबंधाच्या बळावरच या निवडणुकीत डोंबिवलीत पुन्हा एकदा भाजप – महायुतीचे कमळच फुलणार असा विश्वास असल्याचे चव्हाण म्हणाले.महायुतीचे सर्व घटक त्यावेळी आवर्जून उपस्थित होते. ढोल ताशा, प्रचार गाणे यामुळे वातावरण एकदम भारून गेले होते.
