मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे.

पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्याचा शोध सुरु आहे. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरु आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती. मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!