
कल्याण ता,17 :(प्रतिनिधी)
कल्याण पश्चिमेतील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीला आगरी सेनेतर्फे पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. आगरी सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत ठाणकर यांनी या पाठिंब्याचे पत्र कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना दिले आहे.
2024 म्हणजेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आगरी सेनेने महायुतीला पाठिंबा दिला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तशाच प्रकाराचा पाठिंबा जाहीर करत महायुतीच्या हातून राज्यातील गोरगरीब जनतेची सेवा घडावी, यासाठी हा जाहीर पाठिंबा देत असल्याचे आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी पत्रात नमूद केले आहे.
——-